नवी दिल्ली : द्रतगती महामार्गांवर सुस्साट धावणारी वाहने तुम्ही पाहिली असतील. पण गाझियाबादमधील पेरीफेरल एक्स्प्रेस वेवर चक्क लढाऊ विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं. या विमानात दोन वैमानिक होते. दोघेही सखरुप असल्याची माहिती आहे. पण विमानाचा डाव्या बाजूचा पंखा पूर्णपणे तुटला आहे.पेरीफेरल वेवर सदरपूर गावाजवळ हे लँडिंग करण्यात आलं. गरुवारी दपारी १.४५ वाजता हा प्रकार घडल्याची माहिती आहे. या विमानात असलेले दोन्ही वैमानिक सुखरुप आहेत, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधीक्षक कलानिधी नैथानी यांनी दिली.इमर्जन्सी लँडिंगमागचं नेमकं कारण अजन समोर आलेलं नाही. पण तांत्रिक बिघाडामळे वैमानिकांना इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं. असं बोललं जात आहे. कल संबंधित यंत्रणेकडून तपास पूर्ण केल्यानंतरच नेमकं त्याच्या कारण स्पष्ट येईल, अशी माहिती देण्यात आली आहे.
विमानाचं एक्स्प्रेस वेवर लँडिंग ; पंख्याचा चक्काचूर