पुणे - पुणे महानगर परिवहन महामंडळाने पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारातून सुरू केलेली थेट बससेवा रात्रीच्या वेळेतही दिली जावी, अशी मागणी रेल्वे प्रशासनाने पीएमपी प्रशासनाला केली आहे, पीएमपी प्रशासनाने काही दिवसांपूर्वी पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारातून कात्रज, स्वारगेट, कोथरूड, आळंदी, तळेगाव आणि बावधन या मार्गावर बससेवा सुरू केली आहे, रेल्वे स्थानकातून बाहेर पडताच प्रवाशांना या बस मिळत आहेत. त्यामुळे वृद्ध नागरिक, महिला, लहान मुले यांना घेऊन सामानासह लांबवर चालत जाण्याची आवश्यकता राहिली नाही, त्यामुळे या बससेवेला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. रेल्वे स्थानकात रात्रीच्या सुमारास लांब पल्ल्याच्या अनेक रेल्वेगाड्या येतात, त्यामुळे प्रवाशांना प्रवासाची साधने शोधताना कसरत करावी लागते. तसेत, रिक्षाचालकांकडून अचाच्या सध्या भाडेआकारणी केली जाते. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी ही। बससेवा रात्रीही सुरू ठेवावी, असे विभागीय रेल्वे व्यवस्थापक मिलिंद देऊरकर यांनी मालद दऊस्कर याना 'पीएमपी'च्या अध्यक्ष नयना गुड यांना सुचविले आहे. 'मोकळ्या बस सोडाव्यात' : रेल्वे स्थानकातून सोडण्यात येणान्या बस या रेल्वे स्थानकातून सोडण्यात येणाऱ्या बसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत | असल्याने बसची संख्या वाढविली आहे, आता रात्रीही बससेवा सुरू ठेवण्याच्या सूचनेबाबत नियोजन करण्यात येईल. - अजय चारठणकर, | सहव्यवस्थापकीय संचालक, पीएमपी पीएमपीच्या थांब्यावरून सोडण्यात येतात, त्यामुळे बहुतांश बस प्रवाशांनी भरलेल्या असतात. अनेकदा बसमधील दान गर्दी पाहून प्रवासी बस प्रवासाला पसंती देत नाहीत. असेही निदर्शनास आले आहे. त्यामुळे स्थानकातून काही मोकळ्या बसही सोडाव्यात, अशी मागणी प्रवासी करत आहेत.
पुणे रेल्वे स्थानकातून बसची रात्रसेवाही गरजेची - | रेल्वे प्रशासनाने पीएमपी प्रशासनाला केली मागणी