पुणे: __ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाअधिवेशन आज मुंबईतील गोरेगाव भागात होत आहे. या अधिवेशनात राज ठाकरे यांनी पक्षाच्या नव्या झेडयाचे अनावरण कल आहे. हा नवा झेडा पूर्ण भगवा भगवा असून त्याच्या मध्यभागी शिवाजी महाराजांची राजमुद्रा आहे. या नव्या झेडयामुळे आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. या झेंडयाला विविध शिवप्रेमी संघटनांनी विरोध दर्शवला आहे.या झेंडय़ाला विरोध करत संभाजी ब्रिगेडने मनसे पक्ष व मनसे अध्यक्ष यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा असा अर्ज पुण्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त सर्जे राव बाबर यांना देण्यात आला आहे.राजमुदेचा झेंडय़ावर वापर करण्याचा कुठलाही नैतिक अधिकार राज ठाकरे यांना नाही. राजकीय पक्षानं राजमदेचा वापर करणं चुकीचं आहे. त्यामळं शिवप्रेमींच्या भावना दखावल्या असन मनसेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा, असे या तक्रार अर्जात म्हटले आहे.
मनसेचा नवा झेंडा वादातसंभाजी ब्रिगेडचा पोलिसांकडे तक्रार अर्ज.